पीक संगोपन माहिती

खरड छाटणी व ग्राफ्टिंग

खरड छाटणी व ग्राफ्टिंग

एप्रिल छाटणी म्हणजे खात्रीच्या द्राक्ष उत्पादनाचा पाया होय. द्राक्ष उत्पादनात वेलीवर मिळणाऱ्या मालाच्या वजनापैकी ४०% वजन व मुबलक घड संख्या हे फक्त खरडपासून गोड्या बहाराच्या छाटणीपर्यंत केलेल्या कामाच्या नियोजनावरच अवलंबुन असते. म्हणुनच खरड छाटणीतील नियोजनाचे गांभीर्य समजावून घ्यावे. उरलेले ६० % वजन हे गोड्या बहाराच्या छाटणीनंतर मिळणाऱ्या फुटींच्या पानांनी तयार केलेल्या अन्नामुळे वाढत असते. अशा चुकलेल्या नियोजनाची झीज गोड्या बहारच्या छाटणीनंतर कितीही प्रयत्न करुन भरुन   काढताच येत नाही व खरडचे काम नीट न केल्यास उत्पादनात ४० % पर्यंत घट येवू शकते. अशी घट म्हणजे मोठ्या प्रमाणात लहान आकाराचे मणी घडामध्ये राहणे व वजन घटणे होय.

द्राक्षे

द्राक्षे

द्राक्षे उत्पादनात एकसारख्या द्राक्ष उत्पादनासाठी गोड्या बहाराच्या छाटणीनंतर एकसारखे डोळे हुसासण्याच्या प्रक्रियेस फारच जास्त महत्व असते. कारण एकाच वेळी डोळे हुसासल्यास सर्व फुटींवर एकाच वयाची घड निर्मिती होते. व एकसारखा माल तयार होण्यास फारच मदत होते. एकसारखे डोळे हुसासण्याचा जमिनीतील ओलाव्याशी तसेच कोवळे डोळे काडीवर राखून ठेवण्यासाठी व एकसारख्या प्रमाणात डोळयांना मिळालेल्या हायड्रोजन सायनामाईडशी अतिशय जवळचा संबंध असतो.

डाळिंब

डाळिंब

डाळिंबावर येणाऱ्या रोगांमुळे  (सर्कोस्पोरा, बॅक्टरीअल ब्लाइट, भुरी, थ्रिप्स इ.)  होणारी नुकसान टाळण्यासाठी तसेच रोग येऊ नये (प्रिव्हेन्टीव्ह) म्हणून बाजारात उपलब्ध असलेली विविध किटकनाशके व बुरशीनाशके यांच्या मिश्रणशिलतेचा योग्य विचार करुन हे  पिक संरक्षण पत्रक बनविण्यात आले आहे.

टोमॅटो

टोमॅटो

टोमॅटोवर येणाऱ्या रोगांमुळे होणारी नुकसान टाळण्यासाठी तसेच रोग येऊ नये (प्रिव्हेन्टीव्ह) म्हणून बाजारात उपलब्ध असलेली विविध किटकनाशके व बुरशीनाशके यांच्या मिश्रणशिलतेचा योग्य विचार करुन हे  पिक संरक्षण पत्रक बनविण्यात आले आहे.

मिरची

मिरची

मिरचीवर येणाऱ्या रोगांमुळे होणारी नुकसान टाळण्यासाठी तसेच रोग येऊ नये (प्रिव्हेन्टीव्ह) म्हणून बाजारात उपलब्ध असलेली विविध किटकनाशके व बुरशीनाशके यांच्या मिश्रणशिलतेचा योग्य विचार करुन हे  पिक संरक्षण पत्रक बनविण्यात आले आहे.