Azadirechtin 3000 ppm
Azadirechtin 10000 ppm
Cartap Hydrochloride 50% WP
Imdidacloprid 17.8% SL
Imidacloprid 70% WG
Lambdacyhalothrin 5% EC
Thiamethoxam 25% WG
Copper Oxychloride 50% WP
Cymoxanil 50% WP
Metalaxyl 35% WS
Sulphur 80% WP
Ziram 27% SC
Carbendazim 50% WP
Mancozeb 75% WP
Cymoxanil 8% + Mancozeb 64% WP
Forchlorfenuron 0.1% in liquid
Gibberellic Acid 0.001% L
Gibberellic Acid 0.186% SP
सहा दिवसात वाढ वर्धक परिणाम दाखवणारे संजीवक मिश्रण असून वाफसा असणाऱ्या ओलसर जमिनीत पिकांवर फवारणी केल्यास उत्तम फायदा होतो. भाजीपाला व फळभाजी पिकाचे वय ३५ ते ४० दिवसांच्या फवारणीचे उत्तम परिणाम मिळतात.
जोमदार प्लस च्या फवारणीमुळे पानास गर्द हिरवेपणा प्राप्त होतो. तसेच पेशीविभाजन शीघ्रगतीने होऊन प्रकाश संस्लेषनास चालना मिळते व मिथिओनाईन, थायमिन व सिस्टीन सारखी अमिनो आम्ल ह्यांचे रोपातील प्रमाण वाढते. परिणामी पिकांस जीर्णता (म्हातारपण) लवकर येत नाही. द्राक्ष उत्पादनात गर्भधारणेसाठी घड जिरू नये म्हणून तसेच सेटिंग च्या डिपिंगसाठी आवश्यक असे पोषण देणारे संजीवक मिश्रण होय.
पाकळीकुज व झान्थोमोनस (जिवाणूजन्य करपा) रोगाच्या प्रतिकारासाठी अत्यंत उपयोगी असे जिवाणूनाशक व बुरशीनाशक. याच्या फवारणीने द्राक्ष वेलीची कोवळी फूट झान्थोमोनस पासून संरक्षीत राहते. डाळिंबावरील तेल्या नियंत्रणासाठी दोन आठवड्यापर्यंत फायदा मिळतो. तसेच डाळिंब फळावर येणारे गोल काळे ठिपके यांना अटकाव होतो व निर्माण होणाऱ्या खरड्या रोगास अटकाव होतो.
विषाणूंमुळे वनस्पतींमध्ये होणाऱ्या विकृत संजीवकांचे मोठ्या प्रमाणात निर्बलीकरण करण्यास मदत होत असल्यामुळे विषाणुजन्य रोगांची बाधा असतानाही पीक जास्त विकृत होत नाही व फळांचा टिकाऊपणा व चकाकी वाढते. द्राक्षमणी कडक राहण्यासाठी मण्यात पाणी उतरल्यानंतर फवारण्यांचा फायदा होतो.
कोवळ्या फुटीतील सी/एन (कार्बन/नत्र) रेशोत बदल घडवून आणणारे ज्यामुळे गर्भयुक्त डोळे प्राप्त करणे तसेच द्राक्ष घड जिरू नये इ. पोषणात मदत करते.
७०% फ्लावरींग मध्ये होणारी मणीगळ थांबविण्यासाठी व चांगल्या सेटिंगसाठी १५० मिली परिस २०० लीटर पाण्यासाठी घेऊन फवारणी केल्यास चांगला फायदा मिळतो. द्राक्ष मन्यास अपेक्षित आकारमान मिळवून देण्यासाठीचे संजीवक मिश्रण होय. एमएम साईझ ५ ते ७ एमएम असताना ह्यामध्ये द्राक्ष घडाची बुडवणी केल्यास सर्वोत्तम परिणाम मिळतात. १ लिटर पाण्यासाठी फक्त २ मिली पॅरिस २५ मिली दुधासोबत वापरल्यावर उत्तम परिणाम मिळतात.
द्राक्ष मन्यास अपेक्षित आकारमान मिळवून देण्यासाठीचे संजीवक मिश्रण होय. १००% फ्लावरींग पास झाल्यानंतर घड बुडवणीसाठी. ५० पी.पी.एम. जी.ए. सोबत २ मिली / १ लिटर पाण्यासाठी योग्य असे वाढवर्धक.
आंतरप्रवाही तसेच स्पर्शजन्य जंतुनाशके पानांवर एकसारखे पसरविण्यासाठी तसेच झिरपण्यासाठी उत्तम प्रकारे मदत करते. याच्या फवारणीमुळे घडावर दव साचून राहत नाही व पीक रोगास बळी पडण्याची शक्यता कमी होते.
© 2020 हायड्रोपोनिक रिसर्च आणि डेव्हलपमेंट सेंटर